Jeremiah 24:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्यांचे रक्षण करीन. मी त्यांना यहूदाला परत आणीन. मी त्यांचा नाश होऊ देणार नाही मी त्यांना परत उभे करीन. मी नुसतेच त्यांना वर काढणार नाही, तर त्यांना रुजवीन म्हणजे ते वाढू शकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आपले डोळे त्यांच्या चांगल्या करीता लावेन आणि त्यांना या देशात प्रस्थापीत करीन. मी त्यांना खाली पाडणार नाही तर त्यांना बांधीन, मी त्यांना लावीन व उपटनार नाही.