Jeremiah 25:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पण 70 वर्षांनंतर मी बाबेलच्या राजाला शिक्षा करीन. मी बाबेल राष्ट्रालाही शिक्षा करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी खास्द्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांच्या देशाला शिक्षा करीन. मी त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गुलामगिरीची ही सत्तर वर्षे संपल्यानंतर, मी बाबेलचा राजा व त्याचे लोक यांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन करेन; मी खाल्डियनांचा देश कायमचा ओसाड करेन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, आणि असे होईल सत्तर वर्षे संपल्यावर, मी बाबेलाच्या राजाला आणि त्या राष्ट्राला आणि खास्द्यांच्या देशाला त्यांच्या दुष्कृत्यांमुळे शिक्षा करीन.” त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन.