Jeremiah 25:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने मला या गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, माझ्या हातातील द्राक्षरसाचा प्याला घे. तो माझ्या क्रोधाचा द्राक्षरस आहे. मी तुला वेगवेगळ्या राष्ट्रात पाठवीत आहे. त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर, इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवतो त्यांना तो पाज;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह इस्राएलाचे परमेश्वर मला जे म्हणाले ते असे होते: “माझ्या संतापाने काठोकाठ भरलेला हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या हातून घे, आणि मी तुला ज्या राष्ट्रांकडे पाठवेन, त्या सर्व राष्ट्रांना त्या प्याल्यातून प्यावयला लाव.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, त्याने मला हे सांगितले: “माझ्या हातातील क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला घे आणि मी तुला पाठवतो त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.