Jeremiah 25:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला. मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे ऊस देशातील राजे; व पलिष्ट्यांचे राजे (अष्कलोन, गाझा, एक्रोन, अश्दोदचे अवशिष्ट लोक);
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी सर्व मिश्रित लोक, अरब व ऊस देशातील राजे, पलिष्ट्यांच्या देशातील सर्व राजे, अष्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.