Jeremiah 25:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळच्या राजांना मी ही द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. एकामागून एकाला मी तो प्यायला लावला. पृथ्वीवरील सर्व राज्यांना मी परमेश्वरच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून प्यायला लावले. पण बाबेलचा राजा, सर्व राष्ट्रांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच एकामागून एक उत्तरेकडील सर्व देशातील दूर व जवळचे सर्व राजे; जगातील सर्व राजे; सरतेशेवटी शेशाकचा राजा या प्याल्यातून पिईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळचे राजे या सर्वांना, या पृथ्वीवर असणारे सर्व, आपल्या राज्यांसहीत, भावांसहीत, त्या सर्वांना मी तो प्याला प्या प्यायला लावला आहे. पण बाबेलचा राजा, त्या सर्वांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.