Jeremiah 25:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो आवाज पृथ्वीवरील सर्व लोकांपर्यंत पसरतो. हा सगळा गोंगाट कशासाठी आहे? परमेश्वर सर्व राष्ट्रांतील लोकांना शिक्षा करीत आहे. परमेश्वराने लोकांच्याविरुद्ध आपले म्हणणे मांडले. त्यांने लोकांचा न्यायनिवाडा केला. आणि तो आता तलवारीने दुष्ट लोकांना ठार मारीत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” याहवेहची ही घोषणा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आवाज पृथ्वीच्या शेवटापर्यंत येणार, कारण परमेश्वराचा विवाद राष्ट्रांविरूद्ध आहे, तो त्यांचा न्यायनिवाडा करणार. आणि तो सर्व देहावर न्यायव्यवस्था चालवणार. दुष्टांना तो तलवारीस देणार.” परमेश्वर असे म्हणतो.