Jeremiah 25:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मेंढपाळांनो (नेत्यानो) तुम्ही मेंढ्यांना (लोकांना) वळवावे. प्रमुख नेत्यांनो, रडायला सुरवात करा. मेंढ्यांच्या (लोकांच्या) नेत्यांनो, जमिनीवर दु:खाने लोळा. का? कारण ही तुमच्या कत्तलीची वेळ आहे. परमेश्वर तुम्हाला मोडील आणि सगळीकडे पसरवील. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पसराल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; मानवजातीच्या कळपांच्या पुढार्यांनो, धुळीत लोळा. कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा. कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.