Jeremiah 26:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यिर्मया यहूदाच्या राज्यकर्त्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “ह्या नगरीबद्दल व ह्या मंदिराबद्दल ह्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठविले. तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द परमेश्वराच्या तोंडचा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यिर्मया सर्व सरदारांना व सर्व लोकांना म्हणाला, “जी संदेशवचने तुम्ही ऐकली ती सर्व ह्या मंदिराविरुद्ध व ह्या नगराविरुद्ध सांगावीत म्हणून परमेश्वराने मला पाठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग यिर्मयाह सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व लोकांना म्हणाला: “या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टीसाठी भविष्यवाणी करण्यासाठी याहवेहने मला पाठविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.