Jeremiah 26:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“हिज्कीया यहूदाचा राजा होता. पण हिज्कीयाने मीखाला ठार मारले नाही. यहूदातील कोणीही मीखाला ठार मारले नाही. हिज्कीयाला परमेश्वराबद्दल आदर होता, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याची इच्छा होती. हिज्कीया यहूदाचे वाईट करील असे परमेश्वराने सांगितले होते. पण हिज्कीयाने परमेश्वराची करुणा भाकली आणि परमेश्वराचे हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वराने त्या वाईट गोष्टी घडू दिल्या नाहीत. आपण जर यिर्मयाला इजा केली, तर आपण स्वत:वरच खूप संकटे ओढवून घेऊन ती आपलीच चूक ठरेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा हिज्कीया व सर्व यहूदा ह्यांनी त्याला ठार केले काय? त्याने परमेश्वराचे भय धरून परमेश्वराचा प्रसाद मागितला नाही काय? त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे परमेश्वराने म्हटले होते त्याविषयी त्याला अनुताप झाला, तर मग अशाने आपण आपल्या जिवांची मोठी हानी करीत आहोत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजिले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.”