Jeremiah 26:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी आणखी एकाने परमेश्वराचा संदेश ऐकविला होता. त्याचे नाव उरीया तो शमायाचा मुलगा होता. उरीया किर्याथ यारीमचा रहिवासी होता. त्याने ह्या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच गोष्टी सांगितल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या नामाने संदेश सांगणारा असाच आणखी एक मनुष्य होता, त्याचे नाव उरीया; हा किर्याथ-यारीमकर शमायाचा पुत्र; यिर्मयाने सांगितलेल्या सर्व वचनांप्रमाणेच त्याने ह्या नगराविरुद्ध व ह्या देशाविरुद्ध संदेश दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(आता किर्याथ-यआरीम येथील शमायाहचा पुत्र उरीयाह हा याहवेहच्या नावाने संदेश देणारा दुसरा संदेष्टा होता. त्यानेही यिर्मयाहप्रमाणे नगरांविरुद्ध व देशाविरुद्ध या सारखाच संदेश दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत.