Jeremiah 26:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कदाचित् ते ऐकतीलही आणि माझ्या संदेशाचे पालन करतील. पापी जीवन जगण्याचे ते कदाचित् सोडून देतील. त्यांचे परिवर्तन झाल्यास, त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. त्यांनी खूप वाईट कृत्ये केली. त्याबद्दल त्यांना शिक्षा करण्याची योजना मी आखत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यांतला प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या कृतीच्या दुष्टतेमुळे त्यांच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.