Jeremiah 26:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर गोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस! शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल, असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस. यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस!” परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘हे मंदिर शिलोप्रमाणे होईल व हे नगर उजाड व निर्जन होईल,’ असा संदेश तू परमेश्वराच्या नामाने का दिलास?” मग सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात यिर्मयाच्या भोवती जमले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू याहवेहच्या नावाने का भविष्यवाणी करतोस, की हे भवन शिलोहसारखे होईल व हे नगर निर्जन व उजाड होईल?” मग सर्व लोकांनी याहवेहच्या मंदिरात यिर्मयाहभोवती गर्दी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल, ज्यात कोणीच राहत नाही, परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.