Jeremiah 27:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“‘यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्व वचनांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी म्हणालो की, “बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या, त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याशी बोललो आणि त्यास हा संदेश दिला. “तुम्ही आपल्या माना बाबेलाच्या राजाच्या जोखडात द्या आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.