Jeremiah 27:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच मी याजकांना व सर्व लोकांना म्हणालो: “परमेश्वर म्हणतो, जे तुमचे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘पाहा, परमेश्वराच्या मंदिराची पात्रे लवकरच बाबेलहून परत आणण्यात येतील’ त्यांचे हे बोलणे ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, “याहवेह म्हणतात: ‘मंदिरातून नेलेली सुवर्णपात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,’ असे सांगणार्या तुमच्या संदेष्ट्यांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी याजकांना व सर्व लोकांस बोललो, आणि म्हणालो, “परमेश्वर असे म्हणतो, जे कोणी तुमचे संदेष्टे तुम्हास भविष्य सांगतात व म्हणतात, पाहा, परमेश्वराच्या मंदिरातील वस्तू बाबेलाहून आता परत लवकरच आणल्या जातील, ते तुम्हास ते खोटे भविष्य सांगतात. म्हणून त्यांची वचने ऐकू नका.