Jeremiah 27:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते जर खरेच संदेष्टे असतील आणि त्यांना परमेश्वराकडून खराच संदेश मिळाला असेल, तर त्यांना प्रार्थना करु द्या. ज्या गोष्टी अजूनही परमेश्वराच्या मंदिरात आहेत, त्यासाठी त्यांना आळवणी करु द्या. राजवाड्यात अजूनही शाबूत असलेल्या गोष्टींसाठी त्यांना विनवणी करु द्या. यरुशलेममध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींसाठी त्या याजकांना प्रार्थना करु द्या. ह्या सर्व गोष्टी बाबेलला नेल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना आळवणी करु द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते जर संदेष्टे असले व परमेश्वराचे वचन त्यांच्याजवळ असले तर परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत जी पात्रे उरली आहेत ती बाबेलास जाऊ नयेत अशी त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करून पाहावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ते संदेष्टे असतील व त्यांच्याकडे याहवेहचे वचन असेल तर, याहवेहच्या मंदिरातील सुवर्णपात्रे मंदिरात व यहूदीयाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहवी, ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेहस विनंती करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर ते खरेच संदेष्टे असतील आणि त्यांच्याकडे खरेच परमेश्वराकडून वचन मिळाले असेल, परमेश्वराच्या मंदिरात व यहूदाच्या राजाच्या घरात व यरूशलेमेमध्ये ज्या वस्तू उरल्या आहेत, ती बाबेलास जाऊ नयेत, म्हणून त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करावी.”