Jeremiah 27:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टी यरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीमाचा पुत्र यकन्या ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांतील सर्व सरदारांसह पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले तेव्हा त्याने पात्रे नेली नव्हती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या याला, यहूदाचे व यरूशलेमेचे सरदार यांना कैद करून बाबेलास नेले, तेव्हा त्या वस्तू नेल्या नव्हत्या.