Jeremiah 27:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हांला म्हणतात की, ‘बाबेलच्या राजाची सेवा करू नका.’ त्यांचे तुम्ही ऐकू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही आपले संदेष्टे, आपले ज्योतिषी, आपले स्वप्नद्रष्टे आणि आपले मांत्रिक आणि आपले जादूगार, जे तुम्हास म्हणतात की, तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करणार नाही, त्यांचे तुम्ही ऐकू नका.