Jeremiah 28:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी सर्व राष्ट्रांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवीन. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची त्यांनी सेवा करावी, म्हणून मी असे करीन. ते त्याचे गुलाम होतील. मी नबुखद्नेस्सरला वन्यपशूंवरही अंकुश ठेवायला लावीन.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे; त्यांना त्याची सेवा करावी लागेल, मी त्याला वनातले पशूही दिले आहेत.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, ‘बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याची सेवा सर्व राष्ट्रांनी करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवले आहे, ते त्याची सेवा करतील. याशिवाय मी त्यास शेतातील वन्यपशूंवरही अधिकार देईन.”