Jeremiah 28:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर म्हणतो, ‘हनन्या, लवकरच मी तुला ह्या जगातून उचलीन. ह्या वर्षी तू मरशील. का? कारण तू लोकांना परमेश्वराच्याविरुद्ध वागण्यास शिकविलेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, ‘मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन; तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून ह्या वर्षी तू खरोखर मरशील.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.”