Jeremiah 28:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाचा राजा यकन्या यालासुद्धा मी येथे परत आणीन. यकन्या यहोयाकीमचा मुलगा आहे. नबुखद्नेस्सरने यहूदातील ज्या लोकांना बळजबरीने घरे सोडून बाबेलला नेले, त्या सर्व लोकांनाही मी परत आणीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘अशा रीतीने बाबेलच्या राजाने यहूदाच्या लोकांवर लादलेले जोखड मी मोडीन.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकन्या व बाबेलास कैद करून नेलेले यहूदाचे जे सर्व लोक यांस मी परत या ठिकाणी आणीन असे परमेश्वर म्हणतो, कारण मी बाबेलाच्या राजाचे जोखड मोडीन.