Jeremiah 28:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मया हनन्याला म्हणाला, ‘तथास्तु! (आमेन) परमेश्वर खरोखरच असे करो! परमेश्वर तुझा संदेश खरा करील, अशी मी आशा करतो. परमेश्वर खरोखरच त्याच्या मंदिरातील बाबेलला नेलेल्या वस्तू परत येथे आणो आणि बळजबरीने घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांना परमेश्वर येथे परत आणो!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“आमेन! परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे व बंदिवासातले सर्व लोक बाबेलहून ह्या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेशरूपाने सांगितली त्यांप्रमाणे परमेश्वर करो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाह संदेष्टा म्हणाला, “आमेन! तुझे संदेश याहवेह खरे करोत! तू दिलेल्या संदेशाच्या वचनानुसार याहवेहच्या मंदिरातील पात्र व सर्व बंदिवान बाबेलमधून परत येवोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मया संदेष्टा म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातील नेलेल्या वस्तू आणि बंदिवासातील सर्व बाबेलाहून परत या स्थानात आणण्यासाठी परमेश्वराने दिलेली सर्व वचने, जी भविष्य म्हणून तू सांगितली आहेत, ती खरी होवोत.