Jeremiah 29:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोयालाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया यांच्याविषयी सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “ह्या दोघांनी तुम्हाला खोटा संदेश दिला आहे व तो संदेश माझ्याकडून आला असे त्यांनी सांगितले. पण ते खोटे बोलले. मी त्या दोघा संदेष्ट्यांना, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन आणि बाबेलचे कैदी असलेल्या तुम्हा सर्व लोकांसमोर तो त्यांना ठार करील
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘कोलायाचा पुत्र अहाब आणि मासेयाचा पुत्र सिद्कीया हे माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन; व तो त्यांना तुमच्या डोळ्यांदेखत वधील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोलायाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया, ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात, यांच्याविषयी इस्राएलाचा देव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराच्या हाती देईन. आणि तो त्यास तुमच्या डोळ्यांसमोर ठार करील.