Jeremiah 29:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यावरून बाबेलात असलेल्या यहूदाच्या होऊन गेलेल्या सर्व बंदिवान लोकांमध्ये हा शाप प्रचारात येईल की, ‘बाबेलच्या राजाने सिद्कीया व अहाब ह्या दोघांना अग्नीने जाळले तसे परमेश्वर तुझे करो.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर यहूदाचे जे सर्व बंदिवान करून बाबेलात नेलेल्या या मनुष्यांविषयी हा शाप म्हणतील, सिद्कीया व अहाब यांना बाबेलाच्या राजाने अग्नीवर भाजले तसे परमेश्वर तुला करो.