Jeremiah 29:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्यांनी इस्राएलात मूर्खपणा केला आहे, त्यांनी आपल्या शेजार्यांच्या बायकांबरोबर जारकर्म केले आहे, मी त्यांना आज्ञापली नाहीत अशी खोटी वचने त्यांनी माझे नाम घेऊन सांगितली; मी तर हे जाणतो व मी साक्षी आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण त्यांनी इस्राएलमध्ये एक अति घृणास्पद कृत्य केले आहे; त्यांनी आपल्या शेजार्यांच्या स्त्रियांशी व्यभिचार केला, आणि माझ्या नावाने खोटे संदेश दिले—जो अधिकार मी त्यांना दिला नव्हता. हे मला माहीत आहे, कारण त्यांचे प्रत्येक कृत्य मी पाहिले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे यासाठी होईल की, कारण त्यांनी इस्राएलामध्ये लज्जास्पद गोष्टी केल्यात, आपल्या शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर व्यभिचार केला आणि जे मी त्यांना आज्ञापिले नाही ते वचन ते खोटेपणाने माझ्या नावाने बोलले आहेत. कारण जो मी एक आहे तो जाणतो. असे परमेश्वर म्हणतो.