Jeremiah 29:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “शमाया, तू यरुशलेममधील सर्व लोकांना पत्रे पाठविलीस. मासेयाचा मुलगा याजक सफन्या ह्यासही तू पत्रे पाठविलीस. तू सर्व याजकांनाही पत्रे पाठविलीस. परमेश्वराची परवानगी न घेता, स्वत:च्या नावाने तू पत्रे पाठविलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तू आपल्याच नावाने यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांना, मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्याला व सर्व याजकांना पत्रे पाठवून कळवले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरूशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,