Jeremiah 29:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सिद्कीयाने एलास व गमऱ्या यांना नबुखद्नेस्सर राजाकडे पाठविले. सिद्कीया यहूदाचा राजा होता. एलास शाफानचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा होता, यिर्मयाने, बाबेलला नेण्यासाठी, या दोघांजवळ, पत्र दिले. पत्रातील मजकूर असा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाहने शाफानचा पुत्र एलासाह व हिल्कियाहचा पुत्र गमर्‍याह यांच्याकडे सुपूर्द ते केले, जे यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरकडे पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्यांना यहूदाचा राजा सिद्कीया याने बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्याकडे एलास शाफानाचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा यांच्या हस्ते पत्र पाठवले.