Jeremiah 29:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, बाबेलमध्ये असलेल्या सर्व कैद्यांना पुढील निरोप पाठव नेहेलमी घराण्यातील शमाया ह्या माणसाबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘शमायाने तुम्हाला उपदेश केला. पण मी त्याला पाठविलेले नाही. शमायाने तुम्हाला खोटे सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सर्व बंदिवासातल्या लोकांना हे सांगून पाठव की, ‘नेहेलमी शमाया ह्याच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, मी शमायाला पाठवले नसून त्याने तुम्हांला संदेश दिला व खोट्या वचनावर भरवसा ठेवायला लावले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“सर्व बंदिवासांतल्या लोकांस निरोप पाठव व सांग, नेहेलमकर घराण्यातील शमाया याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘कारण शमायाने तुम्हास भविष्य सांगितले आहे पण मी त्यास पाठविलेले नाही. कारण तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवावा, असे त्याने केले आहे.