Jeremiah 29:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लग्न करा, पुत्र व कन्याचा जन्म होऊ द्या; आणि तुमच्या पुत्रांसाठीही वधू शोधा व तुमच्या कन्यांचा विवाह करून द्या, म्हणजे त्यांनाही पुत्र व कन्या होतील. तिथे बहुगुणित व्हा; पण ऱ्हास नव्हे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्त्रिया करा, आणि मुलाला व मुलीला जन्म द्या, नंतर आपल्या मुलांसाठी स्त्रिया करून द्या आणि तुमच्या मुलींना नवरे करून द्या. त्यांनी मुलांना व मुलींना जन्म द्यावा. तेथे तुम्ही वाढा, कमी होऊ नका.