Jeremiah 3:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. इस्राएले लोक रडत आहेत. ते दयेसाठी याचना करीत आहेत. ते फार पापी झाले. ते त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे, इस्राएलवंशजांच्या आक्रंदनाचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे; कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे, ते आपला देव परमेश्वर ह्याला विसरले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत. कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.