Jeremiah 3:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या भयानक खोट्या देवाने बआल देवताने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्व काही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली गिळली. आमच्या तारुण्यापासून हे घडले. त्या भयानक खोट्या देवाने आमच्या वडिलांच्या मेंढ्या आणि गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्या बालपणापासून आमच्या वडिलांचे श्रमफळ म्हणजे त्यांची शेरडेमेंढरे, त्यांची गुरेढोरे, त्यांचे पुत्र व कन्या ह्यांना ह्या लज्जास्पद दैवताने ग्रासून टाकले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमच्या तारुण्यापासून लाजिरवाण्या दैवतांनी आमच्या पूर्वजांच्या कष्टाची फळे— त्यांच्या जनावरांचे थवे व कळप, त्यांचे पुत्र आणि कन्या गिळंकृत केले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.