Jeremiah 30:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल आणि यहूदा, तुमच्या जखमेबद्दल तुम्ही आरडाओरड का करता? तुमची जखम यातना देणारी आहे. पण त्यावर काही इलाज नाही. मी, परमेश्वराने, तुमच्या भयंकर अपराधांबद्दल ह्या गोष्टी घडवून आणल्या. तुमची पापे खूप वाढली. म्हणून मी असे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे; तुझ्या घोर दुष्कर्मांमुळे तुझी पातके फार झाली आहेत; म्हणून मी तुला हे सर्व केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.