Jeremiah 30:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुम्हाला पुन्हा तंदुरस्त करीन. तुमच्या जखमा मी बऱ्या करीन. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस. ते म्हणतात, सियोनची काळजी करणारे कोणीही नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.