Jeremiah 30:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्या वेळी,” हा सर्वशक्तिमान परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल व यहूदा ह्यांच्यामधील लोकांच्या मानेवरील जोखड तोडीन. तुमची बंधने तोडीन. परक्या देशातील लोक पुन्हा माझ्या माणसांना गुलाम होण्यास भाग पाडणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन, ह्यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘त्या दिवशी,’ मी त्यांच्या मानेवरचे जू मोडून टाकेन, त्यांच्या बेड्या तोडेन, आणि यापुढे परकीय लोक त्यांना गुलाम करणार नाहीत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.