Jeremiah 31:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “रामामधून आवाज ऐकू येईल. तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल. राहेल आपल्या मुलांसाठी रडेल तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही सांत्वन करुन घेणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, शोक आणि घोर आकांत, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, “रामांत विलाप आणि अतिखेदाचे रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. ती नाहीत म्हणून सांत्वन पावत नाही.”