Jeremiah 31:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा. घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा. वाटेवर लक्ष ठेवा. तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात. त्याचे स्मरण ठेवा. इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये. तुझ्या गावांना परत ये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जाताना वाटेवर खुणा कर; दिशादर्शक लाव. तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव, त्या मार्गावर लक्ष ठेव. हे इस्राएली कुमारी, परत ये, तू आपल्या नगरांमध्ये परत ये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्यासाठी रस्त्यांवर खुणा कर. तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव. तू जो योग्य मार्ग घेतला, त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्राएला! कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये.