Jeremiah 31:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा म्हणतो, “मी इस्राएलच्या वंशजांना कधीही नाकारणार नाही. लोक जर आकाशाचे मोजमाप करु शकले किवा पृथ्वीच्या पोटातील सर्व रहस्ये जाणू शकले, तरच हे घडणे शक्य आहे. तरच मी इस्राएलच्या वंशजाना नाकारीन. त्यानी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मगच मी त्यांना दूर करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात: “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचात उंच आकाशाचे मोजमाप करणे शक्य असेल, आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील, तर मीही इस्राएलाच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो.