Jeremiah 31:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन व त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आनंदाश्रू ढाळतील. मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील. मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील, कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन. ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.