Jeremiah 32:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी आहेस कारण प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे व त्याच्या कृतीच्या योग्यतेप्रमाणे फळ द्यावे म्हणून तुझे डोळे लोकांचे मार्ग पाहण्यास उघडे आहेत.