Jeremiah 32:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, “यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी, हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खास्द्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, ‘पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सार्वभौम याहवेह, खास्द्यांच्या हाती हे नगर दिले जाणार असूनही तुम्ही मला म्हणता, ‘चांदीची नाणी देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांच्या सहीने खरेदीखत तयार कर.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी तू मला म्हणालास, तू आपल्यासाठी रुप्याने शेत खरेदी कर आणि साक्षीसाठी साक्षीदार बोलाव, जरी मी हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जात आहे.”