Jeremiah 32:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाबेलच्या सैन्याने नगरीवर हल्ला करण्यास अगोदरच सुरवात केली आहे. ते लवकरच नगरीत प्रवेश करतील व आग लावतील. ते नगरी बेचिराख करतील. यरुशलेममधील लोकांनी घरांच्या धाब्यावर दैवत बआल याला नैवेद्य दाखवून मला संतापवले. लोकांनी इतर मूर्तीना पेये अर्पण केली. बाबेलचे सैन्य ती सर्व घरे जाळून टाकेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ह्या नगराबरोबर युद्ध करणारे खास्दी येऊन ह्या नगराला आग लावून जाळून टाकतील, आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीला धूप जाळला व मला चिडवण्यासाठी अन्य देवांना पेयार्पणे वाहिली ती घरेही ते जाळून टाकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील.