Jeremiah 32:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक आपले धन वापरुन शेते खरेदी करतील. ते करारावर सह्या करतील आणि ते मोहोरबंद करतील. लोक खरेदीखतांवर सह्या करतील, तेव्हा इतर लोक साक्षी असतील. बन्यामीनच्या देशात, लोक पुन्हा जमीन विकत घेतील, यरुशलेम भोवतीच्या प्रदेशातील जमीन ते खरेदी करतील. यहूदातील शहरांत ते शेते विकत घेतील. त्याचप्रमाणे लोक डोगराळ प्रदेश पश्र्चिमेकडील डोंगरपायथा व दक्षिणेकडील वाळवंट येथेही लोक जमीन विकत घेतील. मी तुमच्या लोकांना परत घरी आणीन. मग असे घडून येईन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतीच्या प्रदेशातील व यहूदातील नगरांत व डोगराळ प्रदेशाच्या नगरात व तळवटीच्या नगरात व नेगेबच्या नगरात लोक रुप्याने शेते खरेदी करतील आणि खरेदीखतावर सह्या घेऊन मोहोरबंद करतील व साक्षीदार बोलावून आणतील. कारण त्यांचे बंदिवासात गेलेले परत येतील. असे परमेश्वर म्हणत आहे.