Jeremiah 33:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “आता ही जागा निर्जन आहे. तेथे मनुष्य वा प्राणी कोणीही नाही. पण यहूदातील गावे माणसांनी गजबजतील. तेथे मेंढपाळ असतील आणि त्यांच्या मेंढ्यांना रवंथ करण्यासाठी कुरणेही असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जे हे स्थळ ओसाड आहे व ज्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही त्याच्या सर्व नगरांत मेंढपाळ आपले कळप बसवण्यासाठी पुन्हा वाडे करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेह असे म्हणतात: ‘कोणीही मनुष्य व पशू नसलेल्या या उजाड ठिकाणी—यातील सर्व नगरात कळपांना विश्रांती मिळण्यासाठी मेंढपाळांना कुरणे मिळतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, या निर्जन स्थानात, जेथे आता मनुष्य व प्राणी कोणीही नाही. त्यातल्या सर्व नगरात कळप बसविणाऱ्या मेंढपाळांची वस्ती पुन्हा होईल.