Jeremiah 34:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मयाला देवाचा संदेश आला. नबुखद्नेस्सर ह्या बाबेलच्या राजाने यरुशलेम व तिच्या आजूबाजूची गावे ह्यांच्याविरुध्द जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा यिर्मयाला हा संदेश मिळाला. नबुखद्नेस्सरकडे त्याचे स्वत:चे सैन्य व त्याच्या साम्राज्यातील इतर राज्यांची सैन्ये व लोक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सर्व सैन्य, त्याच्या सत्तेखाली असलेली जगातली सर्व राज्ये व सर्व लोक ह्यांनी यरुशलेमेबरोबर व तिच्या सर्व नगरांबरोबर युद्ध चालवले, तेव्हा यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, त्याची संपूर्ण सेना व त्याच्या अंकित असलेल्या सर्व राज्यांच्या व लोकांच्या सेना, यरुशलेम व सभोवतालची सर्व नगरे यांच्याबरोबर युद्ध करीत असताना, यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरूशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,