Jeremiah 34:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदातील सर्व नेत्यांनी व सर्व लोकांनी या कराराला मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करणार होता. प्रत्येकजण कबूल झाला आणि सगळे गुलाम मुक्त झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आम्ही आपल्या सर्व दासांची व दासींची सुटका करू व ह्यापुढे त्यांना दास्य करायला लावणार नाही असा करार ज्या सर्व सरदारांनी व सर्व लोकांनी केला होता ते त्यांना मान्य झाले; त्यांनी मान्य होऊन दासांना मुक्त केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले.