Jeremiah 34:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आता, तुमचे मन बदलले. तुम्ही माझ्या नावाचा मान राखीत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेत. तुम्ही हे कसे काय केले? तुम्ही प्रत्येकाने मुक्त केलेल्या गुलामांना स्त्रिया व पुरुष दोघांनाही परत पकडले. त्यांना बळजबरीने पुन्हा गुलाम केलेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्ही पुन्हा बदलून माझ्या नामाची अप्रतिष्ठा केली व प्रत्येकाने ज्या आपल्या दासाला व दासीला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य दिले होते त्यांना तुम्ही परत येण्यास लावले, व त्यांनी तुमचे दास व दासी व्हावे म्हणून त्यांना तुम्ही आपले ताबेदार केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत.