Jeremiah 34:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
संदेश असा होता, परमेश्वर इस्राएलचा देव म्हणतो, “यिर्मया, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जा व पुढील निरोप दे. ‘सिद्कीया, परमेश्वर असे म्हणतो की मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन व ती तो भस्मसात करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, जा, आणि यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईन व तो ते अग्नीने जाळून टाकील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, याला जाऊन सांग की याहवेह म्हणतात, ‘मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हातात देईन व तो ते जाळून टाकील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदाचा राजा सिद्कीया याच्याशी बोलून सांग, पाहा हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो ते जाळून टाकील.