Jeremiah 34:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी ह्या सर्व लोकांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या हवाली करीन. त्यांची प्रेते म्हणजे पक्षी व वन्य पशूंचे भक्ष्य होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील त्यांच्या जिवांवर टपणार्यांच्या हाती देईन. म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि त्यांना त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व पृथ्वीवरील पशूंना भक्ष्य होतील.