Jeremiah 34:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी यहूदाचा राजा सिद्कीया व तेथील नेते ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या अथवा त्यांना मारु इच्छिणाऱ्या लोकांच्या स्वाधीन करीन. जरी बाबेलच्या सैन्याने यरुशलेम सोडले असले, तरी मी सिद्कीया आणि त्याच्या लोकांना बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हवाली करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना मी त्यांच्या वैर्यांच्या हाती देईन, त्यांच्या जिवांवर टपणार्यांच्या हाती देईन व बाबेलच्या राजाचे जे सैन्य तुमच्यापुढून निघून गेले आहे त्याच्या हाती देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देईन.