Jeremiah 34:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सिद्कीया, तू बाबेलच्या राजाच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला पकडून निश्र्चितपणे त्याच्या ताब्यात दिले जाईल. तू बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील. तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल व तू बाबेलला जाशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, तर तुला पकडून त्याच्या हाती निश्चये देतील; तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील व तो तुझ्याबरोबर समक्ष बोलेल; तू बाबेलास जाशील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू त्याच्या तावडीतून सुटणार नाहीस पण तू पकडल्या जाशील व त्याच्या हातात पडशील. तू स्वतःच्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला बघशील, आणि तो तुझ्याशी समोरासमोर बोलेल व तू बाबेलला जाशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेलास जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलाच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल.