Jeremiah 34:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुला शांतपणे मरण येईल. तुझ्या आधी जे तुझे पूर्वज राजे झाले व ज्यांनी राज्य केले, त्यांना मान देण्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे दफनाच्या वेळी अग्नी पेटविला, तसाच लोक तुला मान देण्यासाठी पेटवतील. ते तुझ्याकरिता शोक करतील व म्हणतील “हाय रे माझ्या धन्या!” मी स्वत: तुला हे वचन देत आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर स्वस्थपणे मरशील; तुझ्या पूर्वीचे राजे, तुझे पूर्वज ह्यांच्याकरता धूप वगैरे जाळत, तसे ते तुझ्याकरता जाळतील व ‘हायरे, माझ्या स्वामी!’ असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; कारण हे वचन मी बोललो आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.”